गड किल्ल्याच्या मुद्द्या वरून अमोल कोल्हेच होत आहेत ट्रोल

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे सध्या सोशल मीडियाच्या वर्कदृष्टीत आहेत. त्यांच्यावर सोशल मीडिया चांगलाच बरसत असल्याचे बघायला आहे. कारण अमोल कोल्हे यांनी किल्ले भाड्याने देण्याच्या सरकारचा खरपूस समाचार घेतला होता. त्यानंतर त्यांनीच २०१६ साली एका रोमॅन्टिक गाण्याचे चित्रीकरण पन्हाळा किल्ल्यावर केल्याचे सोशल मीडियाने शोधून काढले आणि अमोल कोल्हे ट्रोल झाले.

‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमोल कोल्हे, आशिष विद्यार्थी, विक्रम गोखले, दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे, तेजा देवकर, किरण शरद असे कलाकार होते. अवधूत कदम दिग्दर्शित या चित्रपटात बेळगाव सीमावादाचा प्रश्न हाताळण्यात आला होता. या चित्रपटातील ‘हुरहुर लागे श्वासांना’ हे गाणे अमोल कोल्हे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याच्या चित्रीकरणात अमोल कोल्हे रोमॅन्टिक हालचाली करत असल्याचे दिसून येते. अमोल कोल्हेंना गडकिल्ल्याचा एवढाच पुळका येत आहे. तर मग २०१६ साली गाणे चित्रित करताना कळले नाही का असा सवाल नेटकरी अमोल कोल्हे यांना विचारात आहेत.

गडकिल्ले हॉटेल आणि लग्न समारंभाला भाड्याने देण्याच्या सरकारच्या निर्णया विरोधात अमोल कोल्हे यांनी चांगलाच आवाज उठवला होता. जे जे औरंगजेबाला जमले नाही ते या सरकारने करून दाखवले असे म्हणत अमोल कोल्हे यांनी सरकारच्या विरोधात चांगलेच तोंडसुख घेतले होते. मात्र त्यांच्या पूर्व जीवनातील एक चूक शोधून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com