अंबरनाथमधील बंड शमले; राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराचा काँग्रेसला पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी। अंबरनाथ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने काँग्रेस उमेदवाराला समर्थन जाहीर केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीत निर्माण झालेला तिढा अखेर सुटला. दोन्ही पक्षाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेत या वादावर पडदा टाकण्यात आला.

आघाडीच्या जागा वाटपात अंबरनाथ मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाटयाला आला असतांना. काँग्रेस उमेदवार रोहित साळवी यांच्या विरोधात  राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवीण खरात यांनी पक्षाचा एबी फॉम जोडत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज  मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रवीण खरात यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता. त्यामुळे आघाडीत बिघाडी होत दोन्ही पक्षात तणाव निर्माण झाला होता.

अखेर वरिष्ठ पातळीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मध्यस्थी  केल्यानंतर  राष्ट्रवादीचे खरात यांनी काँग्रेसच्या रोहित साळवी यांना समर्थन जाहीर केलं. आपल्याला अडीच वाजता पक्षाचा आदेश आला त्यानंतर मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निघालो होतो, मात्र अर्ज मागे घेण्याची वेळ निघून गेली होती. अशी सरावा सारव  प्रवीण खरात यांनी यावेळी केलीय. तर तिकीट वाटपात काँग्रेसला जागा सुटली असतांना प्रवीण खरता यांना पक्षाचा एबी फॉम मिळालाच कसा? असा सवाल करत एबी फॉम देणाऱ्यावर कारवाईची मागणी आपण पक्षाकडे करणार असल्याचे  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी सांगितलं परंतु  या घटनेवरून दोन्ही पक्षात आलबेल नसल्याचे समोर आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह मात्र मतपेटीवर कायम राहिल्याने काँग्रेसला त्याचा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment