नितेश राणेंच्या प्रचारात ‘तडीपार’ आरोपी सहभागी; शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिंधुदुर्ग प्रतिनिधी । राज्यातील विविध भागांतील तडीपार केलेले आरोपी नितेश राणे यांच्या प्रचारात सहभागी आहेत. आणि ते राजरोसपणे पैसे वाटण्याचे काम करत आहेत असा आरोप सतीश सावंत यांनी केला. सावंत यांच्या आरोपानंतर मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे.

राज्यात भाजप-सेना युती असतांना देखील भाजप कडून उमेदवारी मिळालेल्या नितेश राणेंविरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे राणे समर्थक आणि शिवसेना यांच्यात आता संघर्ष पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून आज सावंत यांनी नितेश यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नितेश राणे यांनी नांदगाव, शिरगाव वैभववाडी या भागामध्ये तडीपार केलेले कार्यकर्ते आणून ठेवले आहेत. आणि ते माझ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पाठलाग करत आहेत. त्यामुळं पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांनी त्याची योग्य ती दखल घ्यावी. अशी मागणी शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांनी केली आहे.

Leave a Comment