मोदी आणि शाह श्वास घेण्यावरही बंदी घालतील; कुणाल कामरावरील कारवाईने कन्हैय्या कुमार भडकला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कुणाल कामरावर कारवाई करुन सरकारने दोन संदेश दिले आहेत. जर तुम्ही शाह आणि शहेनशहा यांची तळी उचलणार असाल तर तुम्हाला कोणत्याही गुन्ह्यातून सरकार सहज वाचवेल. पण, जर तुम्ही त्यांच्या कारभाराचं सत्य जगासमोर आणत असाल तर कायदा धाब्यावर बसवून, सर्व नियम पायदळी तुडवून तुमच्यावर विमान प्रवासाचीच काय श्वास घेण्याचीही बंदी घातली जाईल” अशा आशयाची टीका कन्हैय्याने ट्विटरद्वारे केली आहे.

शाह आणि शहेनशहा म्हणत कन्हैय्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वप्रथम इंडिगोने कुणालवर सहा महिन्यांची बंदी घातली. त्यानंतर केंद्रीय नागरी उड्डान मंत्री हरदीप सिंग सुरी यांनी कुणाल कामरावर अन्य विमान कंपन्यांनीही कारवाई करण्याची सूचना केली. त्यावर अन्य तीन कंपन्यांनीही कामरावर बंदी घातली. यावरुन कन्हैय्या कुमारने संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, इंडिगोच्या विमानात पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या पत्रकारितेच्या पद्धतीवर टीका करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर इंडिगोसह चार विमान कंपन्यांनी बंदी घातली आहे. कुणाल कामराचा अर्णब गोस्वामींना पत्रकारितेच्या पद्धतीबाबत जाब विचारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. कुणाल कामरावरील बंदीवर सोशल मीडियामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी कुणाल कामराचं समर्थन केलंय तर काहींनी त्याच्यावरील बंदी योग्य असल्याचं म्हटलंय. दरम्यान यावरुन जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेते कन्हैय्या कुमार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

जगभरातील शेअर बाजार कोरोना व्हायरसच्या दहशतीत! सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला

भारत दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देणार- मुख्यमंत्री रुपानी

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन

 

Leave a Comment