बिनकामाचा, बोलघेवडा राष्ट्रसेवक परत आलाय; नुसरत जहाँची अमित शहांवर सडकून टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारच्या कोणत्याच योजना राबविल्या जात नाहीत असा आरोप करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांना चांगलाच राग आल्याचे दिसून आले. त्यांनी अमित शहा यांना यावर सडकून उत्तर देत काहीही काम न करता, केवळ बोलणारा कैवारी परत आला आहे असे विधान केले. 

नुसरत जहाँ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून अमित शहा यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी ‘अहा, काहीही काम न करता, केवळ बोलणारा कैवारी परत आला आहे’ असे ट्विट केले आहे. तसेच आम्हाला जेव्हा अ‍म्फान चक्रीवादळात आणि कोरोनाच्या संकटात जेव्हा आम्हांला केंद्र सरकारच्या मदतीची गरज होती. तेव्हा तुम्ही कुठे होता. असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. “२०१४ मध्ये अच्छे दिनचं आश्वासन देण्यात आलं होतं. यानंतर नोटाबंदी, वाढती महागाई, बेरोजगारी, एनआरसी, सीएए, बेजबाबदरीने हाताळलेली करोना परिस्थिती, दुर्लक्षित मजूर या गोष्टी समोर आल्या. बंगालमधील लोक तुमच्या जाळ्यात अडकायला काही आंधळे नाहीत,” असंही नुसरत जहाँ यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/nusratchirps/status/1270272925166268422   

केंद्र सरकारची चांगली आयुष्यमान भारत योजना आजही पश्चिम बंगालमध्ये लागू नाही, अगदी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ही योजना लागू केल्याचे ते म्हणाले होते. मात्र ममता बॅनर्जी ही योजना का लागू करत नाहीत हे आम्हाला आणि पश्चिम बंगालच्या जनतेला ऐकायचं आहे. अशा बाबींमध्ये राजकारण करू नये. असेही ते म्हणाले होते. त्यांनी मोदींकडे ६ वर्षांचा हिशोब मागण्याआधी तुमच्या दहा वर्षांचा हिशोब द्या असे विधान केले होते.  यावरून नुसरत जहाँ यांनी हे ट्विट केले होते. 

Leave a Comment