आमदार संजय कदम यांना एक वर्षाचा सक्षम कारावासाची शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दापोली प्रतिनिधी | २००५ मधील तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा आणण्याचे प्रकरण खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कदम यांना चांगलेच भोवले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खेड दिवाणी न्यायालयाने आमदार कदम यांना एक वर्ष सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावली होती. हा निर्णय अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने कायम ठेवल्याने आमदारा कदमांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले.

न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनुसार आमदार कदम कोर्टाच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार आहेत. कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेनुसार कदम यांची जिल्हा कारागृहात रवानगी होणार आहे. २००५ साली खेडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आणि शेतक-यांच्या या नुकसानाबाबत शेतक-यांनी संबंधित कार्यालयात अनेकदा फे-या मारूनही अधिकारी लक्ष देत नव्हते. त्यामुळे शेतकरी त्याची तक्रार घेऊन माझ्याकडे आले. शेतक-यांची व्यथा ऐकल्यानंतर जाब विचारण्यासाठी संबंधित कार्यालयात गेलो होतो.

परंतू त्यांनी माझ्या विरोधात तोडफोडल आणि शासकीय कामात अडथळा आणल्याची पोलिस ठाण्यात तक्रार केली. शासकीय अधिका-यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे असून अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे कदम म्हणाले.

Leave a Comment