पी.चिदंबरम यांना केलेली अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती- राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांनी चौकशीला सहकार्य करावं आणि देश सोडून जाऊ नये या दोन अटींवर त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर काँग्रेसने ट्विट करत नेहमी सत्याचाच विजय झाला असल्याचे सांगितले आहे.

याच पार्श्वभूमीवर ‘काँग्रेस’चे  माजी अध्यक्ष आणि  खासदार राहुल गांधी यांनी देखील ट्विट करत पी चिदंबरम यांच्यावर केली कारवाई ही सूडबुद्धीची असल्याचे म्हणले आहे. ”पी. चिदंबरम यांची १०६ दिवसांची अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याबद्दल मला आनंद आहे. मला विश्वास आहे की, निष्पक्ष सुनावणीत ते स्वतःला निर्दोष सिद्ध करतील” असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. अटक झाल्यापासून पी चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते.

 

Leave a Comment