मोटारसायकली चोरी करणारी टोळी गजाआड; पंढरपूर पोलिसांची कामगिरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । विविध जिल्ह्यातून मोटारसायकली चोरणाऱ्या एका अंतरराज्य टोळीचा पंढरपूर तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपीकडून सुमारे 4 लाख 33 हजार रुपये किंमतीच्या विविध कंपन्यांच्या 15 मोटारसायकली जप्त केल्या आहेत.याप्रकरणी महेश पांडुरंग चव्हाण या संशयीत आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी बंडु उर्फ जयदीप प्रकाश गायकवाड आरोपी फरार आहे.

कासेगाव (ता.पंढरपूर) येथून 30 जानेवारी रोजी एक मोटारसायकल चोरीला गेली होती. या मोटारसायकल तपासा दरम्यान संशियत आरोपी महेश पांडुरंग चव्हाण याच्याकडे चोरीच्या मोटारसायकली असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी चव्हाण यास ताब्यात घेवून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, साथीदार बंडू गायकवाडच्या साथीने अक्कलकोट,बार्शी, पंढरपूर (जि.सोलापूर),शिरोळ,शाहुपूर (जि.कोल्हापूर),मिरज, जयसिंगपूर (जि.सांगली) येथून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे.

त्यानंतर पोलिसांनी 4 लाख 33 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 15 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बंडु गायकवाड हा संशियत आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment