शरद पवार साहेब Hats Off; पंकजा मुडेंच ट्विट व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारां यांचे दौरे सुरुच आहेत. मग तो नुकसानग्रस्तांसाठीचा पाहणी दौरा असो वा विविध दवाखान्यांना भेटी असोत. त्यांच्या या दौरे करण्याच्या आणि बैठका घेण्याच्या उत्साहाला भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी सलाम केलाय. पंकजा यांनी मंगळवारी रात्री उशीरा ट्विट करत शरद पवारांच्या कामाविषयी आदर व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठिशी मोठा जनाधार आहे. त्याचं मूळ त्यांचा दांडगा संपर्क आणि भेटीगाठीमध्ये आहे. करोनाच्या संकट काळातही शरद पवार यांचे दौरे आणि लोकांसोबतचा संपर्क थांबलेला नाही. शरद पवार यांच्या कामं करण्याचा उत्साह बघून पंकजा मुंडे भारावून गेल्या आहेत. पवार यांच्या कामाचा आदर व्यक्त करत पंकजा यांनी शरद पवारांना सलाम केलाय.

“शरद पवार साहेब, hats off अशा आशयाचं ट्विट पंकजा यांनी केलंय. कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले. पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,” अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केलाय.

राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात २७ ऑक्टोबर पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला. कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीला भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित होते. या बैठकीत मागण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कामाच्या झपाट्याबद्दलचं हे ट्विट केलं.

Leave a Comment