ऊसतोड कामगारांच्या मुद्द्यावर पंकजा मुंडे आक्रमक ; ‘लवादा’ बाबत शरद पवार यांचे मार्गदर्शन घेण्याची केली विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लवादाच्या बाबत सन्माननीय खा.शरद पवार साहेब यांचे मार्गदर्शन घ्यावे. संप हा मजुरांच्या हक्कासाठी आहे. माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत,’ असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

ऊसतोड मजुरांच्या मागण्या मान्य करा अन्यथा कोयता हातात घेऊन ऊसतोड मजूर रस्त्यावर येईल. संप फोडण्याचा प्रयत्न केला तर संघटना आक्रमक होईल. तसंच हातात कोयते घेऊन सरकारला व कारखानदाराला सळो की पळो करून सोडू, असा इशारा यावेळी सरकारला दिला.

ऊसतोड कामगार महामंडळाकडे असणारे विषय हाताळण्यासाठी धनंजय मुंडे यांनाही बैठकीला बोलवावे व जवाबदारी निश्चित करावी. या सोबतच आरोग्यमंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही आमंत्रित करावे व अंतिम निर्णय लवादाने घ्यावा अशा सूचना साखर संघाच्या बैठकीत पंकजा मुंडेंनी केल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment