अव्वल येणार्‍या विद्यार्थ्याला स्पर्धेची भीती नसते- मुख्याध्यापक बजरंग गिल्डा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

शैक्षणिक जीवनामध्ये गुणवत्तेत अव्वल असणाऱ्या विद्यार्थ्याला स्पर्धेची भीती राहत नाही, असे प्रतिपादन मुख्याध्यापक बजरंग गिल्डा यांनी केले. ते पाथरी शहरातील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव चव्हाण विद्यालयाच्या पालक मेळावा, सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते.

पाथरी शहरातील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव चव्हाण विद्यालयामध्ये गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पालक मेळावा, विविध क्षेत्रातील नामवंत यांचा सत्कार व दहावी विद्यार्थी निरोप समारंभ अशा संयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरपरिषद पाथरीचे गटनेते जुनैद दुर्राणी, अध्यक्ष म्हणून ऍड. मुंजाजी भाले पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती कल्पना थोरात, भारत धनले, पाटोदा चे सरपंच सुभाष आंबट, मुख्याध्यापक राम घटे, मुख्याध्यापक सुभाष चिंचाने, मुख्याध्यापक रावसाहेब चंदे, पत्रकार सिद्धार्थ वाव्हळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना मुख्याध्यापक गिल्डा म्हणाले की, सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे असून सर्वच क्षेत्रांमध्ये कमालीची स्पर्धा वाढली आहे .परंतु प्रत्येक विषयात व क्षेत्रात अव्वल असणाऱ्या विद्यार्थी व व्यक्तीस या स्पर्धेची जाणीव होत नाही .त्यामुळे जिद्द, कष्ट ,सचोटी व ध्येय समोर ठेवून सातत्य ठेवत प्रत्येक विषयात अव्वल राहिल्यास भविष्यामध्ये यशस्वी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. बजरंग गिल्डा हे अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा बोरगव्हाण या नामवंत शाळेचे मुख्याध्यापक आहेत.

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील दुघाने यांनी केले. यावेळी जुनैद दुर्राणी यांच्या हस्ते विद्यालयातील ई-लर्निंग कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. तर विविध क्षेत्रात नावलौकीक केलेल्या व्यक्तींचा सत्कार करत, शाळेतील विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार यावेळी करण्यात आला. सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर.एस. गरड यांनी तर आभार आर.एम. शिंदे, पि.एस.दिवाण यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment