कराडात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोची गाढवावरुन मिरवणुक, पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी : शिवसेना नेते संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्या अशी टीका केल्याने त्यांच्याविरोधात सातारा सांगली भागात संतप्त पडसाद उमटत आहेत. याचाच परिणाम म्हणुन आज कराड येथे संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोची गाढवावरुन मिरवणुक काढण्यात आली.

उदयनराजे भोसले यांचेबदल अनुउदगार काढल्याबद्दल कराड मध्ये संजय राऊत यांच्या फोटोची गाढवावरुन मिरवणुक व जोडेमारो आंदोलन करण्यात आले. उदयनराजे समर्थकांकडुन संजय राऊत, जितेन्द्र आव्हाड, नवाब मलिक यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी उदयनराजे समर्थकांनी गाढवाच्या गळ्यात संजय राऊत, जितेन्द्र आव्हाड यांच्या नावाचे फलक लावुन शहरातुन मिरवणुक काढत जोडेमारो आंदोलन केले.

दरम्यान कराड शहरात भाजपा, मराठा क्रांती मोर्चा, शिव प्रतिष्ठान व उदयनराजे समर्थकांकडुन संजय राऊत, जितेन्द्र आव्हाड, नबाब मलिक यांचे फोटोला जोडोमारो आंदोलन करण्यात आले. शिवछत्रपतीं च्या वशंजा बाबत कोणतेही अनुदगार खपवून घेणार नसलेचे सांगत उदयनराजे समर्थकांनी संजय राऊत यांचे पुतळ्याला यावेळी जोडे मारत निषेध व्यक्त केला.

संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांची गाढवावरुन मिरवणुक | Sanjay Raut | Udayanraje Bhosale

 

Leave a Comment