मतदारांनो ‘या’ मुलीचा आदर्श घ्या…!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. सुट्टी असल्याने अनेक जण मतदान करण्याऐवजी घरीच आराम करण्याचा किंवा बाहेर फिरायला जाण्याच बेत आखतात. मात्र मतदान आपलं कर्तव्य आहे, याचा अनेकांना विसर पडतो. मात्र समाजात अशीही काही मंडळी आहेत, ज्यांना कठीण परिस्थितीतही आपल्या कर्तव्याची जाणीव आहे. दिंडोरी विधानसभा निवडणुकीत पेठ शहरातील खातून मुस्ताक शेख ही दोन्ही पायानं अपंग आहे. तरीही या मुलीनं आज मतदानाचा आपला हक्क बजावला.

मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याच आपल्याला लहानपणापासूनच सांगितल जातं. मात्र तरी देखील अनेकांना याचा विसर पडलेला दिसून येतो. मात्र याउलट काहीजण कितीही कठीण परिस्थिती असेल तरी देखील न चुकता आपला मतदानाचा हक्क बजावतात. खातून मुस्ताक शेख हीने त्याचेच एक आदर्श उदाहरणं देशातील नागरिकांसमोर ठेवलं आहे.

अपंगत्वाचा कोणताही विचार न करता आपला हक्क, कर्तव्य या मुलीनं बजावलं. तरुणांनी तर या सर्वांचा आदर्श घेत आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. त्यामुळं सर्वांनी घराबाहेर पडा आणि जास्तीत जास्त मतदान करा आणि आपलं सरकार निवडून लोकशाही बळकट करा. असं आवाहन खातून मुस्ताक शेख हिने नागरिकांना केलं आहे.

Leave a Comment