कृपया झुंबड करू नका! राज्यात ६ महिने पुरेल इतका अन्नधान्य पुरवठा- छगन भुजबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी बाजारात नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. त्यामुळं करोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन भाजी बाजार, किराणा दुकानात झुंबड करू नका असं आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जनतेला केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

राज्यात किमान ६ महिने पुरेल इतका अन्नधान्याचा पुरवठा उपलब्ध आहे. तुम्ही २ महिन्याचं सामान आरामात घेऊन जा मात्र झुंबड करू नका. सरकारने संचारबंदीत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु ठवेण्याचे आदेश दिले आहेत. तेव्हा घाबरून जाऊ नका.

जीवनावश्यक वस्तूंचा बाजार बंद होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. त्यामुळं ग्राहकांनी गर्दी न करता सामान खरेदी करावी अशी विनंती छगन भुजबळ यांनी नागरिकांना केली आहे. राज्यातील बाजार समित्या बंद राहणार नाहीत. शेतकरी आपला माल थेट ग्राहकांना सुद्धा विकू शकतात. संचार बंदीच्या काळात काळाबाजार करून अन्नधान्य विकणाऱ्यांवर कडक कारवाई केल्या जाईल अशी ग्वाही सुद्धा छगन भुजबळ यांनी दिली आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

 

Leave a Comment