नोबेल विजेते मुखर्जींनी घेतली मोदींची भेट, विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जिंकणारे भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी या भेटीची माहिती दिली. तसेच अभिजीत मुखर्जी यांच्यासोबत अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याचेही पंतप्रधानांनी म्हटलं.

पंतप्रधानांनी ट्‌वीटच्या माध्यमातून त्यांच्या या खास भेटीची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, ‘अभिजीत बॅनर्जी यांच्याशी माझी चांगली भेट झाली. मानवी सशक्तीकरणाची त्यांची आवड स्पष्टपणे दिसून येते. आमची बऱ्याच विषयांवर हसतखेळत आणि सर्वसमावेशक चर्चा झाली. त्यांच्या या कामगिरीचा भारताला अभिमान आहे. भविष्यातील प्रयत्नांसाठी त्यांना शुभेच्छा.‘ असे म्हणत मोदींनी या भेटीबद्दल माहिती दिली आहे.

दरम्यान, नुकतेच बॅनर्जी यांनी देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे म्हटले होते. त्यावरुन भाजपाने त्यांना डाव्या विचारांचे असल्याचे सांगत विरोधीपक्षांच्या प्रभावाखील असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर बॅनर्जी हे पंतप्रधानांची भेट घेणार असल्याने सर्वांचे लक्ष या भेटीकडे लागले होते.लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या न्याय या संकल्पनेचे मुखर्जी यांनी कौतूक केले होते त्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.

 

Leave a Comment