महाराष्ट्रातील पूरस्थितीबाबत केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल ; मोदींचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक नद्यांना पूर आले असून पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर केले जात आहे. राज्यावरील या ओल्या दुष्काळाकडे अखेर केंद्र सरकारचं लक्ष गेलं आहे. राज्यातील पूरपरिस्थितीची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला.

याबाबत मोदींनी ट्विट केलं आहे. मोदी म्हणाले, महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन मी पुन्हा एकदा दिलं, असं मोदींनी ट्विट करून म्हटलं आहे.

राज्यात  काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. नागरिकांनाही गाफील राहू देऊ नका.  लोकांना माहिती देत राहा. प्राणाहानी होऊ नये यासाठी नागरिकांना  विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी   राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी व पुरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment