दिल्ली हिंसाचार: अखेर पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईशान्य दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडत नागरिकांना शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना शांती कायम राखण्याच आवाहन केलं आहे.

आपल्या ट्विट मध्ये मोदी म्हणाले,”दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. पोलीस आणि अन्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शांतता आणि सुसंवाद राखणे ही आपली जबाबदारी आहे. मी दिल्लीच्या माझ्या भावांना आणि बहिणींना आवाहन करतो की, त्यांनी कायम शांतता आणि बंधुता जपावी. दिल्ली शहर शांत रहावं आणि लवकरात लवकर पूर्वपदावर यावं हे जास्त महत्वाचं आहे.”

दरम्यान, दिल्लीच्या हिसाचारावरून राजकारण सुद्धा तापलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्ली हिंसाचाराला गृहमंत्री अमित शहा यांना जबाबदार धरत त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या,” दिल्लीतील हिंसाचारमागे राजकीय षडयंत्र असून दिल्ली विधानसभा निवडणुकी दरम्यान सुद्धा असा कट पाहायला मिळाला होता. भाजपच्या नेत्यांनी वारंवार चिथावणीखोर भाषण देऊन भीतीचे वातावरण निर्माण केले. दिल्लीतील सद्य परिस्थितीला केंद्र सरकार, गृहमंत्री आणि दिल्ली सरकार जबाबदार आहे. दिल्लीतील हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment