”परीक्षा पे चर्चा २०२०LIVE”: पंतप्रधान मोदींचा विद्यार्थांशी संवाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । परीक्षेच्या काळात तणावमुक्त कसं रहावं याबाबत विद्यार्थ्यांना कानमंत्र देत आहेत. सलग तिसऱ्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा ‘या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअम येथून ते सर्वांशी थेट संवाद साधत आहेत.

PM Modi interacts with students during ‘Pariksha Pe Charcha 2020’: As PM, I get to attend many types of programmes. Each of the programme provides a new experience. But, if someone asks me what is that one programme that touches your heart the most, I will say it is this one pic.twitter.com/c8LlJhLm2O

— ANI (@ANI) January 20, 2020

तंत्रज्ञानाचे भय बाळगू नका, त्याचे गुलाम बनू नका- पंतप्रधान

कदाचित गेल्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात आणि या शतकाच्या सुरुवातीच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सर्वच बदलून टाकले आहे. आज तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाचा भाग बनले आहे. तंत्रज्ञानाचे भय बाळगता कामा नये. तंत्रज्ञनाला आपला मित्र मानले पाहिजे. तंत्रज्ञान माझ्यासाठी उपयोगी कसे असेल याचा विचार आपण केला पाहीजे. या तंत्रज्ञानाने आपल्यावर कब्जा करता कामा नये. आज आपण जितका काळ स्मार्टफोनवर असतो, त्यांच्यापैकी १० मिनिटं आपण आपल्या आजी-आजोबांसाठी देखील देता आला पाहिजे. ऐकेकाळी सोशल नेटवर्किंग महत्वाचं मानलं जात होतं. पूर्वी आपल्या मित्र-मैत्रीणींना वाढदिवसासाठी भेट देत होतो आता आपण सोशल मीडियावरुनच शुभेच्छा देतो. आपण तंत्रज्ञानाचा वापर जरुर करावा पण स्वतःला गुलाम बनवून घेता कामा नये.

स्वतःवर विश्वास असणं तुम्हाला यशस्वी बनवू शकतं

काही वर्षांपूर्वी झालेल्या एका क्रिकेट सामन्यात राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांनी ज्या पद्धतीने खेळाची बाजी पलटली इतकेच नव्हे तर त्यांनी सामना जिंकला होता. सुरुवातीला संपूर्ण वातावरण नकारात्मक होतं. मात्र, त्यांचा सकारात्मकतेने हे शक्य केलं. एकदा भारताचा संघ वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर गेला त्यावेळी अनिल कुंबळे गोलंदाजी करु शकेल की नाही असे वाटत होते. मात्र, त्यावेळी कुंबळेने ब्रायन लाराची विकेट घेत संपूर्ण सामना बदलवला, अशा प्रकारे आपण स्वतःलाच प्रेरणा देऊ शकतो.

 

‘टेक्नॉलॉजी फ्री अवर’ करायला हवं – पंतप्रधान
तंत्रज्ञानाला स्वतःच्या जीवनाचा भाग होऊ देऊ नका. दिवसातून एक तास तरी तुम्ही तंत्रज्ञनापासून दूर रहायला हवं. घरातील एक खोली अशी करावी ज्यात तंत्रज्ञानाला नो एन्ट्री असावी. त्या खोलीत जो कोणी येईल त्याने सर्व तांत्रिक गोष्टी बाहेर ठेऊनच यावं.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालवू नये : कपिल सिब्बल

Leave a Comment