कोरोना विरोधात पंतप्रधान मोदींचे जनआंदोलन ; देशाला देणार शपथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशा परिस्थितीतच आगामी सण आणि हिवाळा आणि अर्थव्यवस्थेच्या स्थिती लक्षात घेत आणि करोनाबाबात सर्व उपाययोजनांचं पालन करत देश कसा पुढे नेता येईल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ‘जन आंदोलना’ची सुरूवात करणार आहेत.कोरोना वायरसपासून स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी पंतप्रधानांकडून शपथ दिली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका ट्वीटद्वारे या मोहिमेची सुरूवात करणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे सांगण्यात आलं.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. “करोनापासून बचाव करण्याचा एकमात्र उपाय म्हणजे मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आणि हात धुणं हाच आहे. याचाच वापर करून सार्वजनिक ठिकाणी या उपायांबाबत जनजागृती करण्यासाठी मोहिमेची सुरूवात करण्यात येणार आहे,” असं जावडेकर म्हणाले.

“करोना काळात घाबरण्याची नाही तर सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. हा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहिम राबवली जाणार आहे. औषधं आणि लसीशिवाय मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हात धुत राहणं हे करोनाविरोधातील कवच आहे. या मोहिमेंअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीसाठी फलक लावले जाणार आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.

जगभरात प्रत्येक दहावा व्यक्ती कोरोनोबाधित असू शकतो.’ WHO ने केलेल्या वक्तव्यानुसार, जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पॉझिटिव्ह असलेल्या एकूण संख्येच्या जवळपास २० टक्के अधिक असू शकते अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment