धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | जनता कर्फ्यु दिनादिवशीच औरंगाबादमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीच्या लग्नाचा घाट गुपचूपपणे घातला गेला आहे. रात्री ९ ला बंदी हटेल असं वाटल्यानेच हा निर्णय घेतला का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

औरंगाबादमधील हासुर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलीचा हा भव्यदिव्य लग्नसोहळा नियमांचं उल्लंघन करुन पार पाडण्यात येत आहे. यामुळे नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. आता या पोलिस अधिकार्‍यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान लग्नसोहळा सुरु असलेल्या हॉलमधील काही व्हिडियो फुटेज आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून आम्हाला मिळाले असून राज्यात १४४ कलम लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतरही प्रत्यक्ष पोलिसांनीच याचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर काय कारवाई करणार हा प्रश्न जनतेला पडला आहे.

धक्कादायक! कर्फ्यु झुगारून पोलीस अधिकारीच्या मुलीचे थाटात लग्न

औरंगाबाद प्रतिनिधी | जनता कर्फ्यु दिनादिवशीच औरंगाबादमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे थाटामाटात लग्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस अधिकार्‍यांनेच कर्फ्यूचे आदेश झुगारुन गुपचूपपणे मुलीच्या लग्नाचा घाट घातल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रात्री ९ ला बंदी हटेल असं वाटल्यानेच हा निर्णय घेतला का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

औरंगाबादमधील हासुर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलीचा हा भव्यदिव्य लग्नसोहळा नियमांचं उल्लंघन करुन पार पडल्याचे समजत आहे. कल्याण चाबुकस्वार असे पोलीस उपनिरीक्षक वधू पित्याचे नाव आहे अशी माहिती आहे. संपूर्ण देश कोरोनाशी लढण्यासाठी जनता कर्फ्यु दरम्यान  घरात असताना पोलोस अधिकार्‍याच्या मुलीचे लग्न थाटामाटात झाल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या नोटीस बोर्डवरच सदर लग्न पत्रिका लावण्यात आल्याची चर्चा आहे. हर्सूल पोलीस ठाण्याच्या थोड्याच अंतरावर आई साहेब लॉन्स, जळगाव रोड, हर्सूल येथे हा विवाह सोहळा पार पडला आहे. आता या पोलिस अधिकार्‍यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान लग्नसोहळा सुरु असलेल्या हॉलमधील काही व्हिडियो फुटेज आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून आम्हाला मिळाले असून राज्यात १४४ कलम लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतरही प्रत्यक्ष पोलिसांनीच याचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर काय कारवाई करणार हा प्रश्न जनतेला पडला आहे. तसेच लग्नाला लॉन्स ची परवानगी कशी मिळाली? कोणी दिली ? पोलिसांनी वाद्य परवाना, लग्न परवाना कसा दिला..? असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.

Leave a Comment