मध्यप्रदेशातही राजकीय भूकंप ?? ज्योतिरादित्य सिंधिया भाजपच्या वाटेवर…?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । गेल्या महिन्याभरापासुन देशाच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणानंतर आता मध्यप्रदेश मधील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मध्यप्रदेश मधील काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशाबाबत जोरदार राजकीय चर्चा सध्या सुरू आहे.

या चर्चांना पुष्टी म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वर केलेल्या बदलाची जोडण्यात येत आहे. त्यामुळेच अनेक तर्कवितर्कांना आता उधाण आले आहे. त्यात त्यांनी त्यांची ओळख ‘क्रिकेटप्रेमी व लोकसेवक’ अशी बदलवली आहे.

मध्यप्रदेशातील विधानसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव अचानक मागे पडून अनुभवी असलेल्या कमलनाथ यांच्या गळ्यात या पदाची माळ पडली. तेव्हापासून नाराज असलेल्या सिंधिया यांच्या राजकीय हालचाली दिसून आल्या होत्या. लोकसभा निवडणूक जवळ असल्याने त्यांना नवा राजकीय निर्णय घेता आला नाही. त्यामुळे काँग्रेस मध्ये नाराज असलेल्या सिंधिया यांच्या राजकीय हालचाली व भाजपा प्रवेश यांबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.


ज्योतिरादित्य सिंधिया यांचे ट्विटर खाते –



Leave a Comment