बलात्काराला पॉर्न साईटस जबाबदार – नितीश कुमार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। महिलांविरोधातील वाढत्या लैंगिक गुन्ह्यांसाठी पॉर्न साईटस जबाबदार असल्याचे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी इंटरनेटवरील अशा सर्व पॉर्न साईटसवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील बक्सर आणि समस्तीपूरमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत.

देशभरात अशा सर्वच पॉर्न साईटसवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिण्याचा विचार करत असल्याचे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचे फायदे असेल तरी, त्याच्या वाईट परिणामांबद्दल मी नेहमीच चिंता व्यक्त केली आहे असे नितीश कुमार म्हणाले.

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी आज पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु ते न थांबल्यानं पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये हे चारही आरोपी ठार झाले.

Leave a Comment