नालासोपाऱ्यात शिवसेनेचा ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ उमेदवार पराभूत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर प्रतिनिधी । नालासोपारा विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे प्रदीप शर्मा विरुद्ध बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांच्यावर सर्वांचं लक्ष लागलं होतं. निवडणूक निकालात बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. तर ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून पोलीस दलात ख्याती असलेले शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा पिछाडीवर चालत होते.

अखेरपर्यंत ही पिछाडी शर्मा यांना भरुन काढता आली नाही. निवडणुकांआधी झालेल्या प्रचार सभांमध्ये दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी केलेल्या वक्तव्यांमुळे ही लढत अतिशय चुरशीची मानली जात होती. पण अखेर बहुजन विकास आघाडीच्या क्षितिज ठाकूर या मतदार संघात आपलं वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी ठरले. तर शर्मा यांना पराभव पत्करावा लागला आहे. आता नालासोपाऱ्यात शिवसेनेचा ‘एन्काउंटर’ झाल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment