एक राजा बिनडोक ; नाव न घेता प्रकाश आंबेडकरांचा उदयनराजेंवर घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे हे कुठं वाचनात आलं नाही. एक राजा बिनडोक आहे. संभाजी राजेंनी भूमिका घेतली आहे हे बरोबर पण ते इतर गोष्टींवर भर देतात. आम्हाला आरक्षण नाही तर सर्वांचं आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्याला भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मराठा समाजाच्या वतीनं १० ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दिली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी दोन्ही राजाने नेतृत्व करावे, अशी मागणी होत आहे. त्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली.

“दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे, कुठे वाचनात आलं नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजी राजे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिकभर देत असल्याचं मला दिसतंय. ज्या माणसाला राज्य घटना माहिती नाही. ‘आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर सर्वांचे आरक्षण रद्द करा’, अशी ते भूमिका मांडतात. त्यावरून भाजपानं राज्यसभेवर कसे पाठवले? असा प्रश्न पडत आहे,” असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला. “मी कोणालाही अंगावर घेण्यास घाबरत नाही,” असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment