मासळी विक्रेती आई आणि बस कंडक्टर बापाचा मुलगा विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं नवनिर्वाचित सरकार स्थापन झाल्यानंतर सुरु झालेल्या पहिल्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या नेतेपदी शिवसेनेचे सुभाष देसाई यांची तर विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या प्रवीण दरेकर यांची निवड करण्यात आली. सोमवारी नागपूरमध्ये या अधिवेशनाला सुरवात झाली. राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनेवर भाष्य करताना केलेल्या विधानावर मी सावरकरांप्रमाणे माफी मागणार नसल्याचं ठामपणे सांगितलं होतं. भाजपने हाच मुद्दा राज्यात अनेक ठिकाणी उचलून धरल्याचं पाहायला मिळत असताना विधानपरिषद आणि विधानसभेमध्येही याचे पडसाद उमटले. ‘मी पण सावरकर’ लिहिलेल्या लाल रंगाच्या टोप्या घालून भाजपाचे आमदार सभागृहात आले होते.

आपला प्रवास सांगत असताना दरेकर यांनी शिवसेनाप्रमुखाचं प्रेम, राज ठाकरेंचं मार्गदर्शन आणि देवेंद्र फडणवीस यांचं सहकार्य याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. पदावर निवड झाल्यानंतर इतर पक्षातील नेत्यांनी दरेकर यांचं अभिनंदन केलं. जयंत पाटील यांनी नवीन सरकार स्थापन झाल्यापासून शालजोडी मारण्याचा सुरु असलेला आपला कार्यक्रम आजही पुढे नेत दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यातील अंतर्गत स्पर्धेविषयी मजेशीर किस्से सांगितले. प्रवीण दरेकर यांनी जयंत पाटील यांच्यासोबत समन्वय राखत काम करण्यावर भर राहील असा प्रतिसाद यावेळी दिला. दरम्यान सत्ताधारी पक्षातर्फे सभागृह नेतेपदी सुभाष देसाई यांची निवड करण्यात आली.

Leave a Comment