काँग्रेस-राष्ट्रवादीने केली सेनेच्या वाघाची शिकार! राज्यावर राष्ट्रपती राजवटीची टांगती तलवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंब्याचे पत्रचं मिळालं नसल्याने राज्यपालांकडे त्यांना नियोजित अवधीत सत्तास्थापनेचा दावा करताच आला नाही. आदित्य ठाकरेंच्या नैत्रुत्वात शिवसेनेने राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्यासाठी वाढीव तीन दिवसांचा अवधी मागितला होता परंतु त्यांनी तो देण्यास नकार दिला. तसेच राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी सेनेला पाठिंब्याचे पत्र मागितले असता शिवसेना हे पत्र दर्शवू शकली नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी दिवसभर चर्चाच करत राहिले. उद्धव ठाकरेंनी सत्तास्थापनेच्या दिशेने शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या सोबत चर्चा केली.परंतु दोन्ही पक्ष सेनेबाबत निर्णय घेण्यात असमर्थ ठरले आहेत.

याबाबतचे माहिती देणारे ट्विट राजभवनाकडून करण्यात आले आहे. काँग्रेसने सत्तास्थानाचे समर्थन देण्यासाठी शिवसेनेला अट टाकत एनडीए तून बाहेर पडायला लावले होते. त्यानुसार शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. परंतु दिवस अखेर काँग्रेसने शिवसेनेला समर्थनाचे पत्रचं दिल नाही. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेची गेम केल्याचे बोलले जात आहे.त्यानुसार शिवसेनेचे सरकार स्थापनेचे स्वप्न भंग होत राज्यावर राज्यावर राष्ट्रपती राजवटीची टांगती तलवार आहे.

Leave a Comment