दूरदर्शनवर भारत एक खोज अन् संविधान या मालिकादेखील लावाव्यात – पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभर लाॅकडाउन आहे. करमणुक म्हणुन दूरदर्शनवर रामायण आणि महाभारताचे पुन्ह: प्रसारण करण्याचा निर्णय माहिती आणि प्रसारण मंत्रालय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतला आहे. दूरदर्शनवर या मालिकांसोबत भारत एक खोज अन् संविधान या मालिकादेखिल प्रसारित करण्यात याव्यात अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

सध्या लाॅकडाउनमुळे सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या आहेत. तेव्हा विद्यार्थांकरता भारत एक खोज अन् संविधान या मालिका माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पुन्ह: प्रसारित कराव्यात अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. मंत्री जावडेकर यांना आपण पत्राद्वारा या मालिका प्रसारित करण्याबाबत सुचवले आहे अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे. यातील संविधान ही मालिका तर स्वत: राज्यसभेने बनवली आहे. भारत एक खोज ही मालिका देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी लिहिलेल्या डिस्कवरी आॅफ इंडिया या ग्रंथावर आधारित आहे. भारताचा संपुर्ण इतिहास या मालिकेत दाखवण्यात आला आहे. तसेच संविधान मालिका सर्वात प्रथम २०१४ साली प्रदर्शीत करण्यात आली. देशातील संसदेतील कामकाजाचा इतिहास यात दाखवण्यात आला आहे. अशा मालिका शासनाने प्रदर्शित केल्या तर त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.

दरम्यान, सदर मालिकांसोबतच कार्ल सागेन या प्रसिद्ध वैज्ञानिकाची मास्कोस नावाची मालिकाही आपण सुचवली असल्याचे चव्हाण यांनी सांगितके. परदेशात अशा अनेक महत्वपुर्ण मालिका आहेत ज्या विद्यार्थ्यानी पाहिल्या तर त्याचा फायदा होईल. अशा मालिका दाखवल्यास साईंटिफिक टेंपर वाढण्यास मदत होईल. संविधानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असे सांगितले आहे. आणि आता लाॅकडाउनमुळे यासाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे असं चव्हाण म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता

दूरदर्शनवर भारत एक खोज अन् संविधान मालिका दाखवा - पृथ्वीराज चव्हाण

Leave a Comment