अभिमानास्पद ! एशिया पोस्ट सर्वेक्षणात खा. नवनीत राणा पहिल्या पाचमध्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । फेम इंडिया मासिक व एशिया पोस्ट सर्व्हेक्षनात भारतातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या २५ महिलांची यादी प्रसिद्ध करण्यात आलीय. या सर्व्हेक्षणकरिता देशभरातील विविध प्रदेशातून सल्ला घेण्यात आलाय. महिला सशक्तीकरण,फेम इंडिया मासिक,एशिया पोस्ट, सामाजिक स्थिती, प्रतिष्ठा, प्रतिमा, उद्देश, प्रयत्न अशा १० निकषावर नामनिर्देशन पाहण्यात आले. याच आधारे स्टॅकहॉल्टमध्ये भारतातील २५ वेगवेगळ्या प्रकारात महिलांना स्थान देण्यात आलं.

फेम इंडिया मासिक व एशिया पोस्ट यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं पहिल्या ५ महिलांनमध्ये नाव जाहीर करण्यात आलंय. केंद्रात विविध मुद्यांवर उत्तम कामगिरी, अमरावतीसह राज्यातील विविध महत्वाच्या प्रश्नाचं गांभीर्य घेत असल्याने त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मागील नऊ वर्षापासून राजकीय कामाला सुरुवात केलेल्या नवनीत राणा यांनी खासदार होऊन दहा महिने लोटली आहेत.     नवनीत राणा यांनी भरपूर कामे करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लोकांच्या समस्या सोडवायला जेमतेम सुरुवात केली  असल्याने लोकांना प्रचलित झालं असल्याच मत खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केलं.

Leave a Comment