कोथरूडची लढाई ही नेता विरुद्ध कार्यकर्ता अशीच; इथल्या निवडणुकीत काश्मीर कशाला पाहिजे? – किशोर शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी। कोथरुडची निवडणूक ही स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशीच असणार आहे. भाजपचा उमेदवार आजही कोथरूडमध्ये घर घेण्यासाठी धडपडत आहे. अशा परिस्थितीत ज्या माणसाला कोथरुड नक्की काय आहे हेच माहीत नसेल तो इथल्या लोकांमध्ये कसा मिसळणार असा सवाल करत – यंदा कोथरूडमध्ये १०० टक्के परिवर्तन होणार असा विश्वास मनसेचे कोथरुड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किशोर शिंदे यांनी व्यक्त केला. हॅलो महाराष्ट्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

मागील २० वर्षांपासून आपण या ठिकाणी सक्रिय राहून काम करत असून राज ठाकरे यांनी विश्वास दाखवल्यामुळेच इथपर्यंत पोहचू शकलो हे त्यांनी सांगितलं. इतर निवडणुकांपेक्षा ही निवडणूक वेगळी असल्याचं सांगत ही लढाई पक्षांची नसून – नेता विरुद्ध कार्यकर्ता असंच स्वरूप या लढाईला आलं असल्याचं शिंदे म्हणाले.

उद्या महाराष्ट्रात कोणीही नेता उठून कार्यकर्त्याच्या कामावर पाणी टाकू लागला तर ते लोकशाही व्यवस्थेलाही मारक राहील. काश्मीरमधील ३७० कलम हटवल्याचा आम्हालाही आनंदच आहे, पण तो मुद्दा स्थानिक पातळीवर आणताना बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शिक्षणाचा घसरलेला दर्जा, आर्थिक मंदी या प्रश्नावर तुम्ही गप्प का? याचं उत्तरही सत्ताधाऱ्यांनी द्यावं असा टोला शिंदे यांनी भाजपला लगावला. कोथरूडकर जनता सुज्ञ असून कोणत्याही भावनिक विकासाच्या मुद्द्याला ती बळी पडणार नाही असा विश्वासही किशोर शिंदे यांनी व्यक्त केला.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment