पुण्यातील मनसे कार्यालय भगव्या रंगात रंगले; मनसे हिंदुत्वाकडे वळणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच आपल्या पक्षाची भूमिका बदलणार असल्याचे सूचक संकेत आता मिळत आहेत. येत्या २३ जानेवारी रोजी मनसेचं पहिलचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी आयोजित केल आहे. या अधिवेशनात मनसे आपल्या पक्षाची भूमिका आणि झेंड्याची घोषणा केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

पण त्यापूर्वीच पुण्यातील मनसे कार्यालय भगव्या रंगात रंगलेले दिसत आहे. कार्यालयाची नव्यानं रंगरगोटी केली असून कार्यालयाला भगवा रंग देण्यात आला आहे. तसेच नवा झेंडाही लावण्यात आला आहे. कार्यालयाबाहेर भगवे बॅनर लावले असून त्यावर राज ठाकरेंचे फोटो आहे. यामध्ये ‘माझा लढा महाराष्ट्र धर्मासाठी’ असं लिहिलं आहे. त्यामुळं आता मनसे हिंदुत्वाकडे वळणार, अशी चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे.

शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसापासून तशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. मनसेचं येत्या २३ जानेवारीला महाअधिवेशन होणार आहे. मनसेच्या कारकिर्दीतील हे पहिलं अधिवेशन आहे. या अधिवेशनात मनसे आपल्या प्रादेशिक अस्मितेच्या भूमिकेला तिलांजली देत हिंदुत्वाची कास धरणार का? तसेच यावेळी राज ठाकरे कोणती भूमिका जाहीर करणार याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारत सेक्युलर म्हणविणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं. त्यामुळं राज ठाकरे एकेकाळी शिवसेना ज्या हिंदुत्वाच्या मार्गाने राज्यात विस्तारली होती तोच मार्ग अवलंबणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

Leave a Comment