पुणे शहरात कोरोनाचा कहर सुरूच; दिवसभरात सापडले २९१ कोरोनाग्रस्त, १४ जणांचा मृत्यू

पुणे प्रतिनिधी । कोरोना विषाणूने शहरात थैमान घातले आहे. आज दिवसभरात पुणे शहरात एकूण २९१ नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तसेच आज १४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती मिळाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात १ हजार ७३५ स्वॅब टेस्ट नोंदवल्या गेल्या आहेत. आजवरची ही एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. यात २९१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. तर पुणे शहराची एकूण स्वॅब टेस्ट संख्या ३८ हजार ७७० इतकी झाली आहे अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

दिवसभरात घरी सोडलेले रुग्णांची संख्या १८९ असून बरे होऊन घरी सोडलेले आता पर्यतचे एकूण रुग्ण २३७१ झाले आहेत. आज दिवसभरातील एकूण मृत्यू १४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत पुण्यातील एकूण मृत्यू २४२ आहेत. शहारतील एकूण गंभीर रुग्णांची संख्या १६८असून ४९ जण व्हेंटिलेटर वर आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४३९८ वर पोहोचली आहे. यातील ७८६ ॲक्टिव्ह रुग्ण संख्याआहे.

दरम्यान, आज राज्यात तब्बल २ हजार ९४० नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. आजवर सापडलेल्या कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत आज सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत राज्यात एकूण ४४ हजार ५८२ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com