पुण्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले तब्बल ६७५ नवे कोरोनाग्रस्त; ८ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । मुंबईनंतर आता पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. रविवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात तब्बल ६७५ नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. यामध्ये एकट्या पुणे शहरात ६२० कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत तर पिंपरी चिंचवड मध्ये ३७ नवे रुग्ण सापडले आहेत.

पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या १२ हजार ४७४ झाली आहे. तर १७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ४,५२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे शहरातील एकूण तपासणी आता ८७,१७९ झाली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. तसेच रविवारी दिवसभरात राज्यात कोरोनाचे ३ हजार ८७० नवीन रुग्ण सापडले आहेत. सध्या राज्यात ६० हजार १४७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. तसेच रविवारी १ हजार ५९१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आत्तापर्यंत एकूण ६५ हजार ७४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात रविवारी दिवसभरात १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी ६९ मृत्यू हे वर नमूद केल्याप्रमाणे मागील कालावधीतील आहेत. उर्वरित १०१ मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-७० (मुंबई ४१, ठाणे मनपा २९), नाशिक-८ (नाशिक ७, अहमदनगर १), पुणे-१४ (पुणे १४), औरंगाबाद-१ (औरंगाबाद १), लातूर-१ (लातूर १), अकोला-७ (अकोला ४, अणरावती १, बुलढाणा १, वाशिम १). कोरोनामुळे मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६१७० झाली आहे.

हे पण वाचा –

ट्विटरवर नूडल्सची ‘अशी’ रेसिपी व्हायरल झाली कि लोकं म्हणाले, ‘हा तर अपराध’

PM Kisan Scheme | KCC च्या सर्व लाभार्थी शेतकर्‍यांना मिळणार ३ लाखांपर्यंत स्वस्त कर्ज; जाणुन घ्या प्रक्रिया

धक्कादायक! १३ वर्षीय बालिकेचा १८ वर्षाच्या तरुणासोबत ठरला होता विवाह; पण आदल्या दिवशी…

किंगफिशर मधील नोकरी गमावल्यानंतर एअरहॉस्टेस बनली बस कंडक्टर; पहा फोटो

घरी बसून हाताला काम नसेल तर ६ हजारात सुरु करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला कमवा ४० हजार

Leave a Comment