‘राहुल गांधींच्या सभा भाजपच्या जागा वाढवतात’, मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींना उपरोधिक टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना पाहून मला आनंद झाला. कारण राहुल गांधी जेव्हा प्रचार सभा घेतात. तेव्हा काँग्रेसच्या जागा कमी होतात. आणि भाजपच्या जागा वाढतात,  असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला. अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वेचे भाजप सेना महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

राहुल गांधी अजूनही लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून सावरले नाहीत. त्यांच्या भाषणाची कॅसेट अजूनही लोकसभेच्या प्रचारावरच अटकली आहे. असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. आमच्या समोर लढण्यासाठी कोणीच नाही. महायुतीला २२० जागा मिळतात की २४० जागा मिळतात आता फक्त इतकाच मुद्दा शिल्लक असल्याचं देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

सोबतच राहुल गांधी यांनी प्रचारला सुरुवात केली त्यात त्यांनी, ‘देशात उद्योग व्यवसायांची अवस्था अतिशय वाईट आहे. गुजरातमध्ये हिरे उद्योगावर परिणाम झालाय. अनेक कारखाने बंद पडत असल्यान कामगार वर्ग रस्त्यावर येत आहे. देशात आजवरची ४० वर्षांतली सर्वांत मोठी बेरोजगारी आहे. तरुण वर्ग रस्त्यावर आलाय. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्राच्या गोष्टी करत आहेत. देशात इतकी भीषण परिस्थिती आहे. याचा अंदाज तुम्हाला येत नाही. येत्या सहा महिन्यांत परिस्थिती आणखीन बिकट होणार आहे. पण, सरकार त्यावर काहीच बोलायला तयार नाही.’ राहुल गांधी असे सर्व मुद्दे आपल्या प्रचारसभेत मांडत आहेत.

Leave a Comment