राहुल गांधी पुन्हा होणार काँग्रेस अध्यक्ष; रिलॉन्चसाठी काँग्रेसची टीम लागली कामाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी घेत पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळणार असल्याची वृत्त वृत्त ‘इकॉनॉमिक टाईम्स’या वृत्तपत्रानं दिलं आहे. राहुल गांधींना रिलॉन्च करण्यासाठी त्यांच्या सल्लागारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

राहुल गांधींना रिलॉन्च करण्यासाठी काँग्रेसची टीम कामाला लागली आहे. त्यानुसार राहुल देशभरात दौरे करणार आहेत. राहुल गांधींची प्रतिमा बदलण्यासाठी त्यांच्या दौऱ्यांचा कार्यक्रम तयार आहे. या दौऱ्या दरम्यान राहुल गांधी सभांच्या माध्यमातून जनतेला संबोधित करणार आहेत. अर्थव्यवस्था सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी यासारख्या मुद्द्यांवर बोलणार आहेत.

दरम्यान, ‘राहुल गांधींनी पक्षाचं नेतृत्व करावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. त्यांनी अद्याप यावर भाष्य केलेलं नाही. मात्र त्यांनी याबद्दलचा निर्णय घ्यावा याची आम्ही वाट पाहत आहोत,’ असं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितलं. उद्या राजस्थानात जनसभा घेतल्यानंतर ३० जानेवारीला राहुल गांधी केरळमध्ये जनसभेला संबोधित करतील. यानंतर ते झारखंडसह काँग्रेशासित राज्याच्या दौऱ्यांना सुरुवात करतील. या दौऱ्यांनंतर राहुल भाजपाशासित राज्यांमध्ये सभा घेतील.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा

हे पण वाचा-

CAA, NRC लागू होणं हा जिनांचा विजय- शशी थरुर

CAA विरोधात ठराव मंजूर करणारे पश्चिम बंगाल ठरले पाचवे राज्य

खुशखबर : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारची नवीन योजना, दहा हजार कोटी रुपये खर्च करणार !

Leave a Comment