जवानांसाठी नॉन बुलेटप्रूफ ट्रक आणि मोदींसाठी 8400 कोटींचे विमान, हा न्याय आहे का ?? राहुल गांधींचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान मोदींनी 8000 कोटींच विमान खरेदी केल आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. जवानांसाठी नॉन बुलेटप्रूफ ट्रक आणि मोदींसाठी 8400 कोटींचे विमान, असा न्याय का ??? असा थेट सवाल राहुल गांधींनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडिओत एका ट्रकमध्ये काही जवान आपापसांत बोलत आहेत. नॉन बुलेटप्रुफ गाडीत पाठवून आपल्या जीवाशी खेळले जात आहे, असे एक जवान म्हणत आहे. राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, आपल्या जवानांना नॉन बुलेटप्रुफ ट्रकमध्ये शहीद होण्यासाठी पाठवले जात आहे आणि आमच्या पंतप्रधानांसाठी 8400 कोटी रुपयांचे आलिशान विमान! हा न्याय आहे का?

राहुल गांधी यांनी याआधीही मोदींवर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांचा डेन्मार्कच्या पंतप्रधानांबरोबरील चर्चेदरम्यानचा एक व्हिडिओ त्यांनी शेअर करत आमच्या पंतप्रधानांना काही समजत नाही, असे म्हटले होते. ‘खरा धोका हा नाही की, आमच्या पंतप्रधानांना काही समजत नाही. धोका हा आहे की त्यांच्याजवळ असणाऱ्यांपैकी एकाचीही हे सांगण्याची हिंमत नाही,’ असा टोला त्यांनी लगावला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment