२० एप्रिलनंतर टाळेबंदीत शिथिलता? पहा काय म्हणतायत राजेश टोपे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजारच्या पार गेली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येतही वाढ होत आहे. देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सध्या सुरु आहे. २० तारखेनंतर काही भागांत टाळेबंदीत शिथिलता येणार असल्याची चर्चा आहे. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिकृत भाष्य केले आहे. अत्यावश्यक सेवा, शेती याबाबत टाळेबंदीत शिथीलता आणण्याबाबत केंद्र शासनाकडून ज्या सूचना दिल्या जातील त्याचे पालन केले जाईल. २० एप्रिल नंतर परिस्थिती पाहून टाळेबंदीमध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

तसेच दिल्ली येथे मरकजसाठी राज्यातील जे तबलीगी बांधव गेले होते त्यातील सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या चाचण्याही करण्यात आल्या आहेत. त्यातील ५० जण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत. केंद्र शासनाकडे राज्याने ८ लाख एन-९५ मास्कची मागणी केली असू त्यापैकी १ लाख मास्क उपलब्ध झाले आहेत, सुमारे ३० हजार पीपीई कीट उपलब्ध झाले आहेत अशी माहितीही टोपे यांनी दिली आहे.

राज्यात सध्या ३०० कोरोनाबाधीत बरे झले आहेत. त्यांच्यातील रक्तद्राव (प्लाझ्मा) काढून कोरोना बाधीत रुग्णांना ते देऊन त्यांच्यातील अँटीबॉडीज वाढविण्याच्या नविन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही आयसीएमआरकडे परवानगी मागितले आहे. पुल टेस्टींग, रॅपीड टेस्टींगसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) परवानगी मागितली आहे असंही टोपे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत झालेल्या ५१ हजार चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या ह्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. एकूण झालेल्या चाचण्यांपैकी अडीच टक्के रुग्ण पॉझॣटिव्ह आढळले आहेत. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.त्यांच्या मार्फत राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णासाठी तातडीचा वैदयकीय सल्ला दिला जाईल.त्यासाठी समितीतील तज्ञांचे संपर्क क्रमांक राज्यभरातील रुग्णालयांना कळविण्यात आले आहेत.

राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देशात जास्त आहे. त्यातील ८३ ट्कके मृत्यू हे रुग्णाला पुर्वीपासून जडलेल्या मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मुत्रपिंडचा विकार यामुळे झाले आहेत. राज्यात कंटेनमेंट कृतीआराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असून कोरोना रुग्णांच्या दुप्पटीच्या दराचा वेग हा 2 दिवसांवरून 6 दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब आहेअसं टोपे यांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ३ हजार पार..

सोन्याच्या किंमतीने मोडले सर्व रेकोर्ड, जाणुन घ्या आजचे भाव

SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

धक्कादायक! सोलापूरात कोरोनाचे १० नवे रुग्ण

खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

Leave a Comment