राजू शेट्टींनी व्यक्त केली राज्याचे कृषीमंत्री होण्याची इच्छा, मंत्रिमंडळ विस्तारात जागा मिळेल का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. केवळ ४ दिवसात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर राज्यात ठाकरे सरकारच असणार हे निश्चित झाले. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सह पक्षांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावर भाष्य केले आहे. ”सन्मानाने जर विचारणा केली आणि काम करण्याची मोकळीक मिळणार असेल तर कृषी खात्यासारखे आव्हानात्मक खाते सुद्धा सांभाळायला तयार असल्याचे” राजू शेट्टी यांनी म्हंटल आहे.

काल सोलापूर मध्ये ते बोलत होते. दरम्यान ‘सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुद्धा आता सरकारमध्ये मोठे खाते मिळेल अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरच राजू शेट्टींनी सन्मानजनक प्रस्ताव आल्यास राज्याचं कृषीमंत्री स्वीकारण्यास तयारी दर्शवली आहे.

Leave a Comment