संजय राऊतांविरोधात भाजप आमदार राम कदमांची पोलिसांत तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | भाजप आमदार राम कदम शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचे समजत आहे. राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा दाखवा असं म्हणुन चॅलेंज दिले आहे. याविरोधात भाजप आता आक्रमक झाली असून राम कदम राऊतांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत.

भाजप आमदार राम कदम यांनी संजय राऊत यांनी आपलं विधान बिनशर्त मागे घ्यावे अशी मागणी केली आहे. राऊत यांच्या विधानामुळे माझ्यासहित असंख्य शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्यात तेव्हा राऊत यांनी माफी मागावी असंही कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान संजय राऊत यांच्या विधानानंतर राज्यातील राजकिय वातावरण चांगलंच तापलं असून भाजप आता यावरुन राऊत यांना टार्गेट करत आहे. सातार्‍यात बंदचे आवाहन करण्यात आले असून मराठा क्रांन्ति मोर्चानेसुद्धा याविरोधात राऊत यांनी माफि मागावी अशी मागणी केली आहे. तुम्हाला आवडणार्‍या मुलीचं नाच सांगा आपण तिला घरात जाऊन पळवून आणू असं आक्षेपार्ह विधान करणार्‍या भाजप आमदार राम कदम यांनी स्वत:ला शिवप्रेमी म्हटवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Leave a Comment