भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल; घटना स्थळावरून चार जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी

भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह 19 जणांवर मारहाण करीत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी बोरगाव गावात जाऊन आमदारांसह त्यांच्या समर्थकांनी हिम्मतराव पाटील यांच्या घरी गोंधळ घालून मारहाण केली आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अकलूज पोलीस ठाण्यात तुळजापूरचे भाजप आमदार व त्यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 4 जणांना घटनास्थळावरून अटक केली आहे तर आमदार राणासह इतर आरोपी फरार आहेत.

आमदार राणा यांची गाडी MH 43 BP 5511 ही गाडीही घटनास्थळावरून जप्त केली आहे. कळंब पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीतील सदस्य घरात ठेवल्याचा आरोपातून हिंमतराव पाटील यांना मारहाण केली असून मारहाण करणाऱ्या ४ जणांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, राणा यांचे स्वीय सहायक गणेश भातलवंडे , दयाशंकर कंकाळ, पोपट चव्हाण यांच्यासह 4 जणांना घटनास्थळावरून अटक केली आहे.

आमदार राणा यांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप असून भारतीय दंड विधानाचे कलम 307, 323, 504 , 452 , 427 143 148 149 सह शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3 व 25 नुसार गुन्हा नोंद आहे. अकलूज पोलीस ठाण्यात राणाजगजितसिंह पदमसिंह पाटील , सतीश सत्यनारायण दंडनाईक , गणेश नारायण भातलवंडे , दयाशंकर गोपाळ कंकाळ, धीरज मुकुंद वीर, मनोगत उर्फ पिंचू शिनगारे, अरुण बंडोबा चौधरी, प्रणव विजेंद्र चव्हाण , दत्तात्रय बाळासाहेब साळुंके, मेघराज रावसाहेब देशमुख, पोपट ज्ञानोबा चव्हाण यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Leave a Comment