तिकीट मिळण्याच्या खात्रीमुळेच शिवसेनेत प्रवेश करत आहे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

करमाळा प्रतिनिधी | करमाळ्याच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल-कोलते ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी सोडत उद्या ता.२० ऑगस्ट (मंगळवार)ला दुपारी १२ वाजता मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. करमाळा येथिल बागल गटाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे .

या तीन अटीवर रामराजे निंबाळकर करणार भाजपमध्ये प्रवेश

शिवसेनेचे जलसंधारणमंञी प्रा तानाजी सावंत यांच्या माध्यमातून हा प्रवेश होत आहे.यावेळी बोलताना रश्मी बागल म्हणाल्या की, “तिकीट मिळण्याची खात्री आहे, म्हणूनच शिवसेनेत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आमच्यावर होणा-या अन्यायाबाबात पत्र लिहुन, मेसेज टाकून ही काही प्रतिपादन मिळाला नाही. शेवटी कार्यकर्त्यांच्या साठी आम्ही हा निर्णय घेतला. आमची माणसं असुरक्षितत झाली. तयावर इलाज म्हणून हा निर्णय आहे. पाच वर्ष पोळलो आहे. आजपर्यंत चुका झाला आता त्याच चुका आता करायच्या नाहीत.”

राज ठाकरेंना ईडीने पाठवलेल्या नोटिसीवर मुख्यमंत्री म्हणतात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आम्ही निष्ठेने आणि प्रामाणीकपणे काम केले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी दिलेला शब्द कधी खाली पडू दिला नाही. लोकसभेच्या निवडणूकीत सर्व मतभेद विसरून एकदिलाने पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरलो. केवळ उतरलोच नाही तर उमेदवारापेक्षाही अधिक सभा, बैठका, प्रचार फेऱ्या, जनतेशी संवाद साधून उमेदवाराला तालुक्यातून लिड मिळवून दिले. पक्षानी दिलेल्या शब्दाला जागलो. ही तळमळ, धडपड तालुक्यातील संपुर्ण जनतेने जवळून अनुभवली आहे. पण दुर्दैवाने आपल्या उमेदवाराला अपयश आले.

अमरावती नागपूर महामार्गावर एसटी बस उलटली

संजय मामांनी तळागाळातील सामान्य माणसांना सोबत घेऊन उभा केलेला हा बागल गट आहे. याची वाढ करायची असेल, योग्य दिशा देऊन पुढे घेऊन जायचे असेल तर त्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचे होते. असे म्हणत रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.

विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF

WhatsApp Nambar – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur

आदित्य ठाकरेंचे वरातीमागून घोडे ; उद्या करणारा कोल्हापूर सांगली पूरग्रस्त भागाचा दौरा

सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघातून लढवणार गोपीचंद पडळकर लढवणार विधानसभा

गणेश नाईकांचा भाजपला धक्का ; त्यांच्या ‘या’ कृतीने भाजप हैराण

राज ठाकरेंना नोटीस आलेले कोहिनूर मिल प्रकरण नेमके आहे तरी काय?

कोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस ; मनसे कार्यकर्ते आक्रमक

Leave a Comment