बंडखोर भाजप आमदाराने काढली आक्रोश रॅली, तिकीट वाटपात दलाली झाल्याचा केला आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर प्रतिनिधी। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मतदारसंघात बंडखोर भाजप आमदार सुधाकर भालेराव यांनी टिकत न मिळाल्याच्या नाराजीतून आक्रोश रॅली काढली. सोबतच भालेराव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. लातूर जिल्ह्यात बंडखोरी होण्याला कारणीभूत पालकमंत्री असल्याचा दावा करत, तिकीट वाटपात दलाली झाल्याचा आरोप ही देखील भालेराव यांनी केला.

उदगीर विधानसभा मतदारसंघातून तब्बल दोन वेळा निवडून आलेल्या आमदार भालेराव यांचा पत्ता भाजपनं कापल्यानंतर चिडून बंडखोरी करत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तसेच आपले अस्तित्व नमूद करण्यासाठी पहिल्यांदाच भालेरावांनी उदगीर शहरात आक्रोश रॅली काढत आपलं आव्हान कायम असल्याचं सांगितलं. या शिवाय भाजप पक्षात यावेळी तिकीट वाटपात मोठी दलाली झाली असून जिल्हयात बंडखोरी होण्याला कारणीभूत जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर असल्याचा खळबळजनक आरोप करत भालेराव यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

पक्षातल्या दलालांना धडा शिकवण्यासाठी निवडणूक लढणार असल्याचं भालेरावांनी स्पष्ट केले. भालेरावांच्या पहिल्याच रॅलीला उदगीरकरांनी मोठा प्रतिसाद दिल्यानं आता पुन्हा एकदा उदगीर मतदार संघातील राजकीय समीकरणं बदलच्या वळणावर दिसत आहेत.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment