भारतीय सैन्य दलाच्या केंद्रीय राखीव दलात सोलापूरची कन्या भरती- गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथील काळे वस्तीवरील सोनल राजेंद्र तळेकर ही भारतीय सैन्य दलात भरती झाली आहे. सोनल तळेकर हिची केंद्रीय राखीव दलात निवड झाली असून सोनल ही केम गावामधून सैन्यात भरती होणारी पहिली मुलगी आहे. त्यामुळे तिचे गावामधून विशेष कौतुक होत आहे.

सोनल  तळेकर ही केम गावातील राजेंद्र तळेकर या शेतकरी दांपत्याची मुलगी असून ती पदवीधर आहे. तिचे दहावीपर्यतचे शिक्षण उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये पूर्ण केले आहे. सोनल ही जिद्दीने केंद्रीय राखीव दलात भरती झाली. व केंद्रीय दलाच्या माध्यमातून देशसेवा करणार असल्याचे सोनलन सांगितल.

सोनलच्या वडिलांचे शिक्षण अवघे तिसरी पर्यत झालेले ते शेती करतात असे असतानाही मुलगा व मुलगी यात भेदभाव न करता तिला शिकवले. व सोनलने त्या गोष्टीचे चीज ही केले. सोनलने सैन्य दलात भरती होऊन आमच्या कुटूंबाची मान उंचावली आहे. अस मत सोनलच्या वडिलांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment