‘पप्पा, आम्ही करुन दाखवलं !’ – रितेश देशमुख यांचे भावनिक ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. मतदारांनी यंदा सत्ताधारी सेना आणि भाजपाला चांगलाच दणका दिला. महाराष्ट्रात अनेक जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत महायुतीच्या उमेदवारांना जोरदार धक्के दिले. दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या लातूर मतदारसंघाचे देखील निकाल हाती आले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देखमुख यांचे दोन्ही सुपुत्र यंदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. भावांच्या विजयानंतर अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ‘बाबा आम्ही करुन दाखवलं !’ असं भावनिक ट्विट केलं आहे. धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण तर अमित देशमुख हे लातूर शहर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते.

रितेश देशमुख यांनी देखील आपल्या दोन्ही भावांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेत सत्ताधारी पक्षावर टीका केली होती. लातूर ग्रामीण मतदारसंघात धीरज देशमुख यांनी १ लाख ३३ हजारांच्या घरात मते मिळवत आपल्या विरोधकांचा सुपडासाफ केला. तर दुसरीकडे काँग्रेसच्या तिकीटावर लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख यांनी १ लाखापेक्षा जास्त मतं मिळवत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला. अमित देशमुख यांची ही विजयाची हॅटट्रीक ठरली आहे. दरम्यान रितेश देशमुख यांच्या या भावनिक ट्विटला नेटकऱ्यांनीही देखील भरपूर प्रतिसाद दिला आहे.

 

Leave a Comment