मोदींच्या ५ एप्रिलच्या आवाहनावर भाष्य करत रोहित पवारांनी केले ‘हे’ नवे आवाहान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी आज सकाळी देशाला उद्देशून एक व्हिडिओ मेसेज सोशल मिडियावर प्रसारित केला. याद्वारे पंतप्रधान मोदींनी नागरिकांना ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता जातात दिवे घेऊन घराच्या बाहेर जमायला सांगितले. मोदींच्या या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधानांच्या आवाहनावर भाष्य करत नागरिकांना आणखी एक आवाहन केले आहे. सोशल मिडियावरील डिपीवर राष्ट्रध्वज लावून एकतेचे संदेश द्यावा असं पवार यांनी म्हटले आहे.

दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. अशाच प्रकारे आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो असं म्हणत पवार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर सोशल मिडियावर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत. थालीनादच्या वेळी नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा वाजवत ज्या प्रकारे एकत्र जमून जल्लोष साजरा केला तसा प्रकार येत्या ५ एप्रिल रोजी घडू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता

Leave a Comment