आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार जामखेड मधून आगामी विधानसभा निवडणुक लढणार असल्याची चर्चा आहे. रोहित पवार यांनीही जामखेड विधानसभा मतदार संघात भेटीगाठींचा धडाका सुरु करुन मैदान तयार करायला सुरवात केलीय. अशाच एका दौर्‍यादरम्यान रोहित यांनी एका सलूनवाल्याच्या हट्टापायी थेट दर्ग्याशेजारील सलूनमध्ये केसांची कटींग केलीय.

जामखेड येथील हजरत इमाम शहा वली दर्ग्यात रोहित पवार दर्शनासाठी गेलो होते. यावेळी दर्शन घेऊन बाहेर येत असताना जवळील ‘संदीप मेन्स पार्लर’ चे मालक संदिप यांनी रोहित पवारांसोबत फोटो काढण्याची इच्छा दाखवली. यावर रोहित यांनी त्याच्या सलून मध्ये जाऊन थेट कटींगच करुन घेतली.

रोहित पवार यांचे सलूनमध्ये कटींग करतानाचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हाुरल झालेत. रोहित पवार यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट देखील टाकलीय. ‘प्रेमाचा फोटो अन् हक्काची भेट…!’ असा शीर्षक पवार यांनी सदर फोटोला दिलंय. कधी कधी आपल्यावर असलेल्या व्यक्तीचे प्रेम आणि आपले त्या व्यक्तीकडे असलेले हक्काचे काम याचा योग कसा जुळवून येतो ते पहा..! असं पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलंय.

हे पण वाचा –

रोहीत पवार या मतदार संघातून लढणार आगामी विधानसभा?

रोहित पवार आमदार व्हावेत, तरूणांचे रायगडवर जाऊन जगदिश्वराला साकडे

कर्जत-जामखेड : रोहित पवार फिक्स आमदार ; रामाला वनवास

जेव्हा शरद पवारांचे नातू रोहित पवार धारावीत जातात…

विधानसभेसाठी जयंत पाटील यांच्या विरोधात सदाभाऊ खोत!

 

Leave a Comment