पोलीसांसाठी संदिप पाटीलांकडून समर्पन ध्यान शिबीराचे आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | ‘ध्यानामुळे शारीरिक मानसिक संतुलन होते. आपण वर्तमान काळामध्ये राहतो. त्यामुळे आपली प्रगती आपोआप होते करावी लागत नाही’ असे मत समर्पण ध्यानाचे प्रणेते सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामी यांनी व्यक्त केले. मंगळवार, ११ डिसेंबर रोजी पुणे ग्रामीण पोलीस ग्राउंड येथे आयोजीत समर्पण ध्यान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील तसेच पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि हजारहून जवान उपस्थित होते. खास पोलीस प्रशासनात काम करणार्यांना ध्यानातून मानसिक संतुलन मिळवून देण्याच्या उद्देशाने सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ध्यानाचे महत्त्व सांगताना श्री शिवकृपानंद स्वामी यांनी ”पोलीस वर्गातील व्यक्तींना ध्यान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजातील दुषित घटनांमध्ये, प्रसंगांमध्ये पोलिसांना सतत राहावे लागते. त्यामुळे त्यांचे जीवन राहणीमान असंतुलित झाले आहे. यामुळे घरामध्ये, जवळपासच्या परिसरामध्ये असंतुलनाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यावर ध्यान हा एकमात्र उपाय आहे” असे म्हटले. २०‍१८ हे वर्ष रक्षक वर्ष म्हणून घोषीत केले असल्याचेही यावेळी श्री शिवकृपानंद यांनी सांगितले.

‘आतापर्यत पुणे, मुंबई, अहमदाबाद, कच्छ ,अजमेर अशा अनेक शहरामध्ये ध्यान शिबिरे घेतली आहेत. या वर्षामध्ये आम्ही भारतातील पोलीस, S.R.P.F, C.R.P.F, B.S.F चे जवान, आर्मी, नौदल यासारख्या सर्व रक्षकांसाठी शिबिर घेत आहोत. यामधील बरेच रक्षक नियमित ध्यान करत असल्यामुळे त्यांना मानसिक संतुलनाचा लाभ झाला आहे. तसेच प्रत्यक्ष सीमेवरती काम करत असणाऱ्या जवानांच्या शरीर सौरक्षनाचे अनुभव आले आहेत’ असेही ते म्हणाले. ‘२४ तासातील अर्धा तास ध्यान केले असता जवानांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या शारीरिक व मानसिक संतुलनास मदत होइल’ असे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले.

Leave a Comment