भारत चीन संघर्षात साताऱ्याचे जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |भारत चीन संघर्षात लेह लडाख सीमेवर महाराष्ट्रातील सातारा जिल्यातील जवान सचिन संभाजी जाधव हे हुतात्मा झाले आहेत. सचिन जाधव हे लेह लडाख सीमेवर 111 इंजिनिअरीग रेजिमेंट मध्ये कार्यरत असताना वीरमरण आले असल्याची माहिती सातारा जिल्हा सैनिक अधिकारी यांनी दिली आहे.

हुतात्मा सचिन संभाजी जाधव हे लेहमध्ये कार्यरत हाेते. बुधवारी (ता.16) ते हुतात्मा झाले असून त्यांचे पार्थिव पुणे येथे आज (शुक्रवार) रात्री दहा वाजता आणण्यात येणार आहे. तेथून ते सातारा जिल्ह्यात आणले जाणार आहे. हुतात्मा सचिन जाधव हे 111 इंजिनिअरींग रेजिमेंटमध्ये कार्यरत हाेेते.

सध्या चीन बरोबर भारताचा संघर्ष सुरु आहे. हुतात्मा सचिन जाधव हे मनमिळावू स्वभावाचे हाेते. या घटनेमुळे संपुर्ण सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.उद्या (शनिवार) शासकीय इतमामात अंत्यविधी होतील अशी प्राथमिक माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment