….तर वेळ आल्यास तलवार पण काढेल ; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत असून मराठा आरक्षणासंबधी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, असा आरोप संभाजीराजे यांनी यावेळी केला. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, वेळ आल्यास तलवार पण काढेल, असा सज्जड इशारा खासदार संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे. आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, अशा शब्दांत त्यांनी ठणकावलं.

राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ, असं नुसतं बोलण्यापेक्षा या सगळ्याला दिशा द्यावी. नंतर तुम्हाला जे राजकारण करायचेय ते करत बसा, अशा शब्दांत छत्रपती संभाजीराजे यांनी महाविकासआघाडी सरकारला फटकारले. माझा पक्ष गेला खड्यात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. राज्यात होणारी मराठा आंदोलनं भाजप पुरस्कृत नाहीत, असंही संभाजीराजेंनी यावेळी स्पष्ट केलं.

खासदार संभाजी राजेंच्या भाषणातील ठळक मुद्दे…

1) आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत

2) समाजाला मांडी लावून बसणे हेच माझा राजवाडा

3) आम्ही दिल्ली ला पण येण्यासाठी घाबणार नाहीत, राज्य सरकार व केंद्र सरकारला आव्हान

4) माझा पक्ष गेला खड्यात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार

5) समाजाला टाकद देण्यासाठी भवानीचा आशीर्वाद घेतला आहे

6) आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment