सावरकरांच्या नावे एखादे विद्यापीठ असावे, केंद्र सरकारने एवढे तरी करावे – संजय राऊत 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भारतीय स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज जन्मदिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी कवी आणि लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांचे जीवन हे अनेक आक्षेपांनी भरले आहे. त्यांच्यावर सातत्याने वेगवेगळ्या अंगानी आक्षेप घेतले जात असतात. अनेक वाद घातले जातात. तर एकीकडे सावरकरांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे. सावरकर विरोधी आणि सावरकर प्रेमी असे यद्ध नेहमीच जुंपलेले असते. आज त्यांच्या जनदिनानिमित्त शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या नावे एखादे विद्यापीठ असावे . केंद्र सरकारने तेवढे तरी काम करावे असे ट्विट केले आहे.

संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून त्यांनी सावरकरांना अभिवादन केले आहे. सावरकर हे खरे भारत रत्न असे ते म्हणाले आहेत. ते म्हणतात, ‘वीर सावरकर हे खरे भारत रत्न! पण त्यांच्या नावा पुढे लागणारी स्वातंत्रवीर ही ऊपाधी त्याहून मोठी. इंग्रज सरकारने सावरकरांची ही पदवी काढून घेतली. सावरकरांच्या नावे एखादे विद्यापीठ असावे. केंद्रीय सरकारने एवढे तरी करावे.’ अशा पद्धतीने त्यांनी सावरकरांना आदरांजली वाहिली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकार्यात सहभागी होते. त्यांनी काही ग्रंथ, कविता, गझल लिहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे साहित्यही प्रसिद्ध आहे. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला….’ हे त्यांचे स्वातंत्र्यगीत सर्वज्ञात आहे. २८ मे १८८३ साली त्यांचा जन्म झाला होता. ब्रिटिश सरकारविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सहभाग होता.

Leave a Comment