बालिश बुद्धीच्या निलेश राणेंना ‘हिजडा’ शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर मी सांगते..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ‘गुलाल तिकडे चांगभलं’ या नियमाने आपली राजकीय वाटचाल चालू ठेवणाऱ्या नारायण राणे आणि त्यांच्या दोन चिरंजीवांना सध्या सोशल मीडियात चर्चेत राहण्याची नवनवीन कारणं मिळाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने हीन पातळीवरील टीका करण्यात राणे पुत्र आघाडीवर आहेत. शरद पवारांनी साखर कारखान्याबाबत नरेंद्र मोदींना केलेल्या सुचनेनंतरही निलेश राणे यांनी ट्विट करुन शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर रोहित पवारांनी कोंबडी प्रकरणाचा दाखला दिल्यानंतर निलेश राणे यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्याचं पाहायला मिळालं. आज पुन्हा एकदा एका वेगळ्या वादाचं लक्ष निलेश राणे बनले आहेत.

एका ट्विटमधून त्यांनी प्राजक्त तनपुरे या राष्ट्रवादीच्या राहुरीतील आमदारांवर टीका केली आहे. विद्यमान नगरविकास, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी कल्याण आणि ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्यावर टीका करताना त्यांनी हिजडा या शब्दाचा उच्चार केला आहे.

त्यांच्या या टीकेला पुण्यातील सामाजिक कार्यकर्ती सारंग पुणेकर हिने चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

जर हिजडा शब्दाचा अर्थ माहीत नसेल इतिहास माहीत नसेल तर मी सांगते पण आपली बालिश बुद्धी जगाला दाखवू नका, जेंव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरावैरा पळत ना तशीच काही तुमची गत झालीये, तोंडाला आळा घाला हिजडा शब्द काढा नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल.

सारंग पुणेकर

सारंगच्या या ट्विटला नेटकऱ्यांनीही उचलून धरलं असून काहीही बरळणाऱ्या निलेश राणेंना सारंगने लावलेली ही सणसणीत चपराक समजली जात आहे. हिजडा समुदायाचा अपमान करणारं हे ट्विट असून ते मागे घेण्याच्या सूचना सारंगने केल्या आहेत. सारंग ही सध्या पुण्यातच लॉकडाऊनमुळे हाल होत असलेल्या लोकांसाठी काम करत असून विविध सामाजिक प्रश्नांवर ती नेहमीच संविधानिक मार्गाने व्यक्त होत असते. आता या प्रकारानंतर निलेश राणे तो शब्द ट्विटमधून काढून माफी मागणार का? याकडे लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

Leave a Comment